उदयपूर येथील कन्हैयालाल हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने मदरसांना निधी देणे बंद करावे. आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत. तसेच एनआयएकडून केवळ हिंदूंच्या हत्त्येतील दोषींचा शोध न घेता ही हत्या करणाऱ्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी केली जावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केली आहे.
उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन वजा पत्रक रमेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. उदयपूर राजस्थान येथील कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, संविधान आणि लोकशाहीवर आक्रमण आहे.
या हत्येमागे केवळ दोन मुसलमान नसून त्यामागे त्यांचा ब्रेन वॉश करणारे मदरसे, मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी संघटना जबाबदार आहेत. हिंदूंच्या हत्या करणाऱ्या अशा समाजविघातक प्रवृत्तींच्या फक्त घरावरच नव्हे तर या जिहादी विचारधारेवर देखील बुलडोझर फिरवावा लागणार आहे. सरकार प्रशासन या जिहाद्यांवर लगाम घालणार नसेल तर हिंदू समाजाला दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटित व्हावे लागेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिला असल्याचे पत्रकात नमूद आहे.
याखेरीज ‘लष्कर -ए -हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर प्रसाद खंडेलवाल यांनी आतंकवादी मानसिकता संपविण्यासाठी आणि भारताला आतंकवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस आणि सैन्याला मोकळीक द्यायला हवी असे परखड मत व्यक्त केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रकात नमूद आहे. त्याचप्रमाणे कन्हैयालाल हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने मदरसांना निधी देणे बंद करावे. तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदर्से बंद करावेत.
एनआयएने केवळ हिंदूंच्या हत्त्येतील दोषींचा शोध न घेता ही हत्या करणाऱ्यांना पैसा पुरवणारे त्यांना अश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी स्वतः रमेश शिंदे यांनी केली आहे. निवेदन सादर करतेवेळी हिंदू जनजागृती समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.