बेळगाव जीएसटी आयुक्तालयातर्फे जीएसटी दिन साजरा

0
1
Gst day
 belgaum

कर प्रशासनात ऐतिहासिक बदल घडवून आणणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या देशभरातील गेल्या 5 वर्षातील तारकीय आणि अखंड यशस्वी अंमलबजावणीत उद्योग आणि कर प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन बेळगाव येथील केंद्रीय जीएसटी आयुक्त बसवराज नलेगावे यांनी केले.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालय राजस्व विभागाच्या बेळगाव येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तथा केंद्रीय उत्पाद शुल्क आयुक्तालयातर्फे नेहरूनगर येथील केलेली शताब्दी सभागृहात काल शुक्रवारी जीएसटी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने आयुक्त नलगावे बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जीएसडब्ल्यू उद्योग समूहाच्या टॅक्स विभागाचे प्रमुख विनीत अग्रवाल, एमएलआयआरसीच्या जे. एल. विंगचे कमांडंट मेजर जनरल परमदीपसिंग बाजवा आणि केएलईचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने जीएसटी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विनीत अग्रवाल यांनी यावेळी बोलताना जीएसटीमुळे प्रत्येक राज्यात कर भरणे ही प्रक्रिया थांबल्याने मालाची वाहतूक 40 टक्क्याने वाढली आहे. ही कर प्रणाली ग्राहकाभिमुख असल्याने अवघ्या 5 वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकली आहे, असे सांगितले.Gst day

 belgaum

डॉ. विवेक सावजी यांनी जीएसटीचे विविध पैलू मांडत टेक्नॉलॉजीमुळे कर प्रणालीमध्ये बदल होत असल्याचे स्पष्ट केले. मेजर जनरल परमदीपसिंग बाजवा, चेंबर ऑफ कॉमर्सचे रोहन जुवळी, नितीन निंबाळकर आदींनीही यावेळी आपले समवेत विचार व्यक्त केले.

जीएसटी दिनाचे औचित्य साधून यावेळी पर्यावरण क्रीडा व्यवसाय महिला सबलीकरण अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अमोल दूध फाउंडेशनच्या आरती भंडारी यांच्यासह सोनिया नेतलकर, बिष्णोई, दिपाली घोडके, श्रीमती नागरत्न सुनील रामगौडा, सीमा पवार आदींचा समावेश होता. बेळगाव जीएसटी विभाग यांच्यावतीने आयोजित या जीएसटी दिन कार्यक्रमास बेळगावसह इतर जिल्ह्यांमधील उद्योजक, सीए, व्यापारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. सहआयुक्त डी. श्रीकांत यांनी सर्वांच्या आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.