माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची अहवेलना होऊ नये हे एक सामाजिक तत्व( जबाबदारी) आहे ह्याच तत्वाला बेळगाव महानगरपालिकेकडून हरताळ फासला जात आहे.चिदंबरनगर स्मशानभूमीत लाईट नसल्यामुळे मृतदेहांची हेळसांड होऊन तिथल्या नागरिकांना मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंतिम संस्कार उकरावे लागत आहेत.स्मार्ट सिटी बेळगाव असलेल्या महापालिका कार्यक्षेत्रात अशी वेळ आली आहे.
दुःखाच्या प्रसंगी सामाजिक तत्त्व म्हणून आजूबाजूच्या गोष्टी या त्याच्यासाठी सकारात्मक असाव्या लागतात ह्या परिस्थितीत एक बाब लक्षात येते की माणसं दुःखात असताना त्यांच्यावर असा अनावस्था दाखवणारा प्रसंग यावा आणि त्यातून एकंदरच माणसाला उद्विग्नता यावी अशा पद्धतीची ही घटना घडल्यानंतर एकंदर महानगरपालिका कोणत्या प्रकारचा कारभार करत आहे नागरिकांना कोणत्या सुविधा पुरवत आहे ह्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभा राहत आहे.
पंढरपूरला वारीला जाताना अपघातात निधन झालेल्या अनगोळ येथील दोघांचा अंतिम संस्कार रविवारी सायंकाळी चिदंबर नगर स्मशानभूमीत पार पडला त्यावेळी चक्क विद्युत बल्पाची सोय स्मशानभूमी नसल्याने जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या टॉर्चच्या लाईटच्या सहाय्याने अंतिम संस्कार करावे लागले.एकीकडे बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून घेते महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी असतो मात्र दुसरीकडे स्मशानभूमीची अवस्था ‘बेळगाव नव्हे तर बिहारची’ आहे अशी चर्चा या ठिकाणी होत होती.
या सगळ्या घटना क्रमांकावर बघताना एक गोष्ट लक्षात येते की अनेक नागरिकांना सुविधा पुरवताना महानगरपालिका कमी पडत आहे ह्या सगळ्यावर कोणता उपाय करता येईल याचाच नागरिक विचार करत आहेत. एका बाजूला महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि महापौर अजून निवडला गेला नाही ते सगळं प्रकरण लोम्बकाळत आहे अनेक गोष्टीच्या बाबतीत निधी उभारला जातो निधी दिला जातो पण तो निधी कुठल्या खड्ड्यात जात आहे का? हेच लोकांच्या लक्षात येत नाही अशाही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
आज प्रत्येक रस्ते असू देत,किंवा कचराकुंड्याचे प्रश्न असू देत, गटारीचा प्रश्न असू देत स्मशानभूमीचा प्रश्न असुदेत सगळ्या गोष्टीत अपूर्णता निदर्शनात येते त्यामुळे एकंदर ह्या सगळ्या माणसाच्या जगण्याच्या प्राथमिक मूलभूत गरजा नीट पणाने आणि नीट मनाने महानगर प्रशासनाकडून पुरवल्या जात नाहीत याकडे नीट लक्ष वेधणे गरजेचे आहे. पावसामध्ये कोणत्या स्मशानभूमीत गळती असते पत्र्यामधून पाणी गळत असते तर कोणत्याच मशीन भूमीमध्ये लाईटचा अभाव असतो या सगळ्या मूलभूत सुविधा महापालिकेने पुरवाव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.