पावसाळा आणि पर्यटन हे गणित ठरलेले. त्यामुळे आपसूकच पावले पर्यटनाकड वळतात. सध्या पावसाळा सुरु झाल्याने महाराष्ट्रातील सीमेवर असलेल्या धबधबे आणि पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षा पर्टनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओढा धबधब्यांकडे वाढू लागला आहे . मात्र या पर्यटन स्थळांवर शिस्तीचा अभाव दिसत असून निसर्ग पाहण्यापेक्षा सेल्फिची क्रेझ दिसत आहे.
गोकाक धबधब्यावर हुल्लडबाजी बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असलेल्या गोकाकच्या धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी वाढली आहे.गोकाकच्या धबधब्यामध्ये धबधबा पाहायला जाऊन अनेकजण बुडाले आहेत अनेक वेळा अपघात झालेले आहेत तरी देखील पर्यटकांची हुल्लडबाजी वाढली आहे.अनेकजण धोकादायक सेल्फी घेताहेत.
पर्यटक बेशिस्त प्रशासनाचे दुर्लक्ष
उंच दगडावर जाऊन सेल्फी काढणे. पाण्यात उतरून सेल्फी काढणे असे प्रकार सुरू आहेत. पर्यटक बेशिस्त असून पर्यटकांना आवरण्यासाठी अद्याप संरक्षण कठडे बांधण्यात आलेले नाही किंवा पोलिसांचा देखील इथे बंदोबस्त नाही त्यामुळे गोकाक धबधबा पाहण्यासाठी येऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कुणाचेच नियंत्रण नाही. यासाठी या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढून घेणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे.
पर्यटकांचा वाढता ओढा-पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्री पर्वतात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढलीआहे त्यामुळे गोकाकचा धबधबा जोराने वाहू लागला आहे 180 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक दररोज गोकाकला येत आहेत. या पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरेना झाला आहे.
प्रशासनाचे नियंत्रण हवेच-फॉल्स परिसरामध्ये डेंजरस सेल्फींची संख्या पाहता आगामी दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊ शकतात यावर प्रशासनाने नियंत्रण आणण्याचे मागणी करण्यात येत आहे.
हा धबधबा पाहायला जाणारे लोक प्रवासी पर्यटक सावध तरी कधी होणार?हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. नूतन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.