बेळगाव येथील सर्व पदवी, अभियांत्रिकी ,पॉलिटेक्निक आणि पदव्युत्तर महाविद्यालयांसाठी अंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .दि 21 जुलै ते 23 जुलै या कालावधीत के एल एस, आय एम आर बेळगाव आयोजित स्पर्धा जी आय टी क्रीडांगणावर पार पडल्या.
या स्पर्धेत बेळगाव शहरातील एकूण 16 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.बेळगाव शहरातील सर्व नवोदित फुटबॉलपटूंना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी के एल एस आय एम इ आर तर्फे तीन वर्षानंतर सदर अंतर महाविद्यालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अंतिम फेरीत जीएसएस महाविद्यालयाचा 2-० गोलने पराभव करून ट्रॉफी जिंकली. जीएसएस कॉलेज उपविजेते ठरले.जीआयटी कॉलेज कडून मिस्टर रेगन आणि मिस्टर नागदीप हे दोन गोल करणारे होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला प्रदान करण्यात आला.मॅन ऑफ द फायनल मॅचची पारितोषिक जीएसएस कॉलेजच्या प्रांजलने, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोल रक्षकाचे पारितोषिक पलाश,जीएसएस कॉलेज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक जीआयटी महाविद्यालयाचे नागदीप हंगल यांना प्राप्त झाले.
यावेळी बेळगावचे जेष्ठ फुटबॉलपटू आणि कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे बेळगाव प्रतिनिधी श्री विक्टर परेरा समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.गवर्निंग कौन्सिल के एल एस आयएमईआर चे अध्यक्ष आर.एस.मुतालिक हे समारंभाचे अध्यक्ष होते.
प्रमुख पाहुणे, अध्यक्ष,डॉ.आरिफ शेख यांनी उपविजेता आणि विजेता संघाला ट्रॉफी प्रदान केली.जीआयटी क्रीडा संचालक डॉ. पी व्ही आणि प्राध्यापक श्रीकांत नाईक क्रीडा समन्वयक केलेस आयएमएस समारंभ समारोप समारंभास उपस्थित होते संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन जॉर्ज रोड्रिक्स आणि विद्यार्थी संघ सदस्य आकांक्षा,निधी आशा जस्टिन पॉल आणि केतकी पाटील यांनी केले.