कुटुंबाकडून मिळालेला देशसेवेचा वारसा जपत त्याने वायु दलात कार्यरत होण्याचे स्वप्न पाहिले, ते पूर्ण देखील करून दाखवले आहे. प्रथमेश प्रदीप चव्हाण पाटील यांची भारतीय हवाई दलात टेक्निकल विभागामध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली असून आता चव्हाण पाटील यांची चौथी पिढी देशसेवेत कार्यरत असल्याचे त्याने सांगितले.
वडगाव बेळगाव येथील प्रथमेश प्रदीप चव्हाण पाटील याची वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली आहे. वडगाव येथील सेवेन्थ डे या स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन बारावीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालय सांबरा येथे पूर्ण केले.
शेषगिरी महाविद्यालयातन न इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.पुढे बेंगलोर येथे जनरल मोटर्समध्ये काम करत असताना ए.एफ. कॅट ही परीक्षा देत वायु दलात कार्यरत होण्याच्या स्वप्नाची पहिली पायरी पूर्ण केली.
पुढे मुलाखत देऊन वायुदलात टेक्निकल विभागासाठी निवड करण्यात आली.मेडिकल टेस्ट , प्रशिक्षण या सर्व प्रक्रियेनंतर त्याने फ्लाईंग ऑफिसर पदी झेप घेत कुटुंबातील चौथी पिढी देशसेवेत हे स्वप्न पूर्ण करून दाखवले.
कुटुंबातूनच मिळाला हा वारसा
प्रथमेश चव्हाण पाटील यांनी वायुदलात भरती होण्यासाठी कुटुंबातूनच प्रेरणा मिळाल्याचे सांगितले चौथी पिढी सैन्य दलात असून स्वातंत्र्यापूर्वी किंगज कमिशनच्या सैन्य दलात चव्हाण पाटील यांची पहिली पिढी कार्यरत झाली. यानंतर पनजोबा कर्नल म्हणून सेवेत रुजू झाले.
तसेच आजोबा दिनकर दिनकर चव्हाण , ऑनररी कॅप्टन चव्हाण तात्यासाहेब चव्हाण आणि यानंतर वडील नायक प्रदीप चव्हाण यांनी देशसेवेची परंपरा राखली.आज चौथी पिढी अर्थात प्रथमेश हा वायुसेवा दलात भरती झाला आहे. पूर्वीपासूनच देशसेवेचे बाळकडू मिळाले आहे.आपण आई-वडील बहीण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळेच हे यश मिळवू शकलो असल्याच्या भावना प्रथमेश याने व्यक्त केल्या.