जनतेच्या ररेट्यापुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माघार घेतली आहे.अनेक खाद्य वस्तूवर पाच टक्के जीएसटी कर लादल्यामुळे नागरिकात प्रचंड मोठी नाराजी दिसून येत होती याचा अनेक स्तरावर निषेध नोंदवला जात होता याची दखल घेत जी एस टी मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला.
बेळगावातील नागरिकांनी याबाबतीत चिंता व्यक्त केली होती आणि गेल्या शनिवारी रविवार पेठे सह पूर्ण मार्केटमधील व्यवहार बंद करून या जीएसटीचा विरोध व्यक्त केला होता.महागाई वाढणार यामुळे ठिकठिकाणी याचा निषेध केला गेला होता.
देशभरातून नाराजीचा सूर उमटला होता त्यामुळे जनतेचे रेट्यापुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी माघार घेत खाद्यपदार्थावरील जीएसटीचा कर रद्द केला आहे.
डाळी, गहू, मोहरी, मका, पीठ, तांदूळ ,रवा,बेसन, दुग्धजन्य पदार्थ लस्सी ताक, दही यावरचा जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करून दिली आहे.
याआधी केंद्र सरकारने कृषी कायदे लागू केले होते आणि रद्दही केले होते त्यानंतर आता अतिरिक्त जीएसटी रद्द करून माघार घेतली आहे त्यामुळे मागे घेतलेला हा दुसरा निर्णय आहे.
सरकार सध्या राक्षसी बहुमतामध्ये असल्यामुळे अनेक निर्णय सरकार वाटेल तसे घेत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जगण्यात खूप अडचणी निर्माण होतात. आणि नंतर तेच कायदे परत रद्द केले जातात त्यामुळे लोकांच्या संभ्रम निर्माण होतो तरी केंद्रीय नेतृत्वाने विचार करून निर्णय जाहीर करताना जर घोषणा केल्या तर लोकांना आणि व्यापाऱ्यांना अधिक सोयीस्कर होईल अशा प्रकारचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.