गरोदर माता व बाळंतीणला पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने मातृपूर्ण योजना राबविण्यात आली. मागील दोन वर्षापासून सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारा आहार घरी देण्यात येत होता.मात्र आता पुन्हा एकदा सदर आहार घेण्यासाठी गरोदर माता व बाळंतिणींना अंगणवाडीत जावे लागणार आहे.कारण घरी मिळणारे रेशन बंद करण्यात आले असून आता शिजवलेले अन्न रोज दुपारी अंगणवाडीत जाऊन जेवावे लागणार आहे.
गरोदर माता व बाळंतिणींना अंगणवाडीत जावे लागणार आहे. मात्र याला विरोध होत असून धान्यआहार घरी द्यावा अशी मागणी होत आहे.
गरोदर माता तसेच बाळंतिणीला पौष्टिक आहार मिळावा यासाठी मातृपुर्ण योजनेचा सुरवात करण्यात आली.यामुळे अंडी, दूध पावडर, शेंगदाणे, मूग असे पौष्टिक पदार्थ वितरित करण्यात आले. मात्र सदर पदार्थ आता शिजवून देण्यात येणारं असून ते जेवण्यासाठी माताना अंगणवाडीत जावे लागणार आहे.
मातांसाठी राबवण्यात आलेली योजना उपयुक्त आहे. मात्र अंगणवाडीत जाऊन जेवणे शक्य नसल्याने ही योजना ज्या हेतूने आयोजित करण्यात आली होती तो हेतूच यामुळे दूर होणार आहे. प्रामुख्याने गरोदर माता व बाळंतिणींना पौष्टिक आहार मिळावा म्हणून या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात आली होती.
मात्र अंगणवाडीत जाऊन जेवणे हे शहर तसेच ग्रामीण भागातील गर्भिणी तसेच बाळंतीना शक्य नसल्यामुळे किती अन्न शिजवावे हा प्रश्न देखील सदर अंगणवाडी सेविका यांच्यासमोर उभा आहे. दररोज त्यांनी अंगणवाडीत यावे आणि जेवून जाताना सही करून जावे असा याचा नियम आहे मात्र जर बाळंतीण अंगणवाडीत येत नसतील तर या योजनेचा हेतू असफल ठरणार आहे. यामुळे गर्दीने व बाळंतिणींना देण्यात येणारा आहार घरीच द्यावा अशी मागणी केली जात आहे