दोन फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स (एफटीओ) अर्थात वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर झाल्यामुळे बेळगाव विमानतळ सुदैवी ठरले असले तरी ही दोन्ही केंद्र अद्यापही सुरू व्हावयाची आहेत.
मे. संवर्धने टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बेंगळूर आणि दुसरे मे. रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दिल्ली ही दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रे (एफटीओ) बेळगाव येथे सुरू होणार आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या 2021 मध्ये झालेल्या स्पर्धात्मक बोली प्रक्रिये प्रसंगी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) नऊ वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाच विमानतळं मिळाली आहेत. त्यापैकी एएआयने बेळगाव (2), जालना (महाराष्ट्र), कलबुर्गी खजुराहो व लीलाबरी येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्रे (एफटीओ) मंजूर केली आहेत.
यापैकी जालना व लीलाबरी येथील प्रत्येकी एक आणि कलबुर्गी येथील दोन अशी एकूण 4 एफटीओ सध्या कार्यान्वित झाली आहेत. थोडक्यात बेळगाव वगळता अन्य सर्व चारही वैमानिक प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. बेळगाव येथील एफटीओ जून महिन्यात सुरू होणार होती. मात्र कांही कारणास्तव त्याला विलंब झाला आहे.
एएआयकडून बेळगाव विमानतळासाठी लिंक टॅक्सी ट्रॅक पूर्ण झाला असून मार्किंगही झाले आहे. बेळगाव विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना रचना, बांधणी, चालवणे, देखभाल आणि हस्तांतरण (डीबीओएमटी) यांच्या आधारे केली जाणार आहे विमानतळावरील ही.
दोन्ही प्रशिक्षण केंद्र प्रत्येकी 5000 चौरस मीटरमध्ये स्थापन केली जाणार आहेत. तसेच भाडेपट्टी प्रति चौरस मीटर याप्रमाणे आकारली जाणार आहे. देशात या पद्धतीने वैमानिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश जागतिक स्तरावर भारताला वैमानिक प्रशिक्षण केंद्र बनविणे हा आहे.
बेळगाव विमान तळावर एफ टी ओ फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनसजेशन आणि कार पार्किंगचे काम सुरू pic.twitter.com/IjpiSmw9tb
— Belgaumlive (@belgaumlive) July 23, 2022