सतत होत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे सतर्क राहावे अशा सूचना कर्नाटकाचे जलसंपदा आणि बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कारजोळ यांनी पत्र लिहून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना संभाव्य पुरा बाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.महाराष्ट्रात सतत होत असलेल्या संततदार पावसाने कृष्णा नदीच्या काठावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सीमावर्ती भागातील जलाशये भरणाच्या मार्गावर आहेत.
कर्नाटकातील अलमट्टी जलाशयात देखील 75.200 क्यूसेक्स पाणी जमा झाले आहे त्यामुळे कर्नाटकातील कृष्णा नदीच्या काठावर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने संपूर्णपणे सतर्क राहावे कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहून आवश्यक ती कारवाई करावी आणि योग्य त्या सूचना संबंधित खात्याला द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
पालकमंत्री यांच्या संभाव्य पुराच्या धोक्याच्या सूचनेच्या अगोदरच बेळगाव जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी तयारी केली आहे.
कोणत्याही पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे असा विश्वास जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.