दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तीने कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेतून ते कोणतीही इजा न पोचता सुदैवानं बचावले आहेत.
मंगळवारी रात्री बैलहोंगल शहरांमध्ये ही घटना घडली त्यामुळे या परिसरात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातानी शिवरंजन बोळणावर यांच्यावर गावठी पिस्तुलने गोळीबार केला केला मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही गोळी लागली नाही.
बैलहोंगल शहरातील हनुमान मंदिराजवळ शिवरंजन बोळन्नवर यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. अज्ञातांनी तीन ते चार राऊंड फायर केले मात्र शिवरंजन यांना कोणतीच गोळी लागली नाही फायरिंग करताच अज्ञातांनी दुचाकीवरून पळ काढला.
घटनास्थळी बैलहोंगल पोलिसांनी धाव घेतली आणि शिवरंजन यांच्याकडून त्यांच्यावर कुणी गोळीबार केला का केला असावा याबद्दल माहिती जाणून घेतली. गोळीबार झाल्यानंतर अज्ञात ज्या मार्गावरून फरारी झाले त्या मार्गावर असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोळीबार करण्याचे नेमकं कारण काय? याचाही शोध घेतला जात आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील अतिरिक्त पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मंगळवारी रात्रीच भेट देऊन पाहणी केली.