Monday, May 6, 2024

/

त्या भिंतीची पुनर्बांधणी…

 belgaum

टिळकवाडी दुसरे रेल्वे गेटच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे रेडिमेड कुंपण घालण्यात आले आहे. अडीच वर्षांपूर्वी बांधकाम झाले असतानाही भिंत आतील बाजूस रुळाच्या बाजूने कलली आहे.

ही भिंत कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे याबाबतची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलचे सदस्य संतोष दरेकर यांनी संबधीत रेल्वे विभागाला दिली होती. तात्काळ याची दखल घेत रेल्वेच्या बांधकाम विभागाने याबाबत पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.Railway wall

याबाबत महिती मिळताच बांधकाम ठिकाणी वरच्या अभियंतांनी भेट दिली.या भिंतीची पाहणी केली असता ही भिंत खांबावर उभी करण्यात आली आहे. मात्र पायाच्या ठिकाणी पावसामुळे पाणी पायाखालच्या बाजूला वाहून गेल्याने भिंत एका बाजूला कलली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खोलवर पाया काढून ही भिंत बांधण्याचा निर्णय रेल्वेच्या बांधकाम विभागाने घेतला आहे.भिंत कलल्याने ती धोकादायक बनली आहे.

 belgaum

पदपथावरून जाणाऱ्यांना याचा धोका आहे कोणत्याही वेळी भिंत पडू शकते याचा धोका ओळखून, रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अनिस हेगडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी नैऋत्य विभाग यांनी रेल्वे रुळलगतची संरक्षक भिंत कललेली आहे.पावसाचे पाणी जाऊन पाया खचला आहे.यामुळे भिंत धोकादायक बनली आहे याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून रुळापासून ही भिंत दूर आहे .सध्या धोका नसला तरी पुढील महिन्यात या भिंतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे असे सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.