Thursday, December 26, 2024

/

शेषगिरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने तांत्रिक परिसंवादाचे आयोजन

 belgaum

केएलईच्या डॉ एम एस शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आयईईई नॉर्थ कर्नाटक सबसेक्शन आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैविध्यम-२२ या दोन दिवसीय तांत्रिक परिसंवादासह प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध तांत्रिक संस्थांमधील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी या परिसंवादात भाग घेतला. जवळपास ६५ कॉलेजनी त्यांचे प्रकल्प प्रदर्शित केले होते. एम्बेडेड सिस्टीम, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पॉवर सिस्टीम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या ऍप्लिकेशन्समध्ये हे प्रकल्प प्रदर्शित केले.

*वैविध्यम 22* चे उदघाटन आयईईई, बंगलोरच्या अध्यक्षा डॉ जलजा एस यांच्या हस्ते करण्यात आले. इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि उपस्थितांना परिसंवादाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.

उद्घाटनाच्या दिवशी प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी आणि रिसर्च डीन डॉ. राजकुमार रायकर यांच्या प्रमुख भाषणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या नवीन टप्प्याच्या उदयाविषयी उपस्थितांना प्रबोधन केले आणि विशिष्ट क्षेत्रात प्रकल्प आणि प्रशिक्षणाद्वारे कौशल्य वाढीला चालना दिली. याप्रसंगी बोलताना डॉ. कटगेरी यांनी केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये दिले जाणारे बहु-विषय आणि कौशल्य-आधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, भविष्यातील अभियांत्रिकी पदवीधरांना संपूर्ण डोमेनमधील तांत्रिक समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.Engneering  kls

वैविध्यम-२२ निमित्त एक मॅगझीन प्रसिद्ध करण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सी-क्वाड रिसर्चचे संचालक डॉ.उदय वाली यांचे मुख्य भाषण होते, ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप्लिकेशन्स आणि इमर्सिव्ह डिस्प्ले ग्राफिक्ससाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी समाविष्ट करण्यासाठी प्रोसेसर डिझाइनमधील नाविन्यपूर्ण वास्तुशास्त्रीय बदलांवर भाष्य केले.

आयईईईचे उत्तर कर्नाटकाचे चेअरमन,
डॉ. बसवराज अनामी यांनी उपस्थितांना त्यांच्या कल्पना एकत्रित करण्यासाठी आणि तांत्रिक संस्थांमधील विद्यार्थी आणि तज्ञांशी नेटवर्किंग करण्यासाठी प्रकल्प प्रदर्शन व्यासपीठाचा सर्वोत्तम वापर करण्याची माहिती दिली. उत्तर कर्नाटक उपविभागाचे आयईईई सचिव प्रा. रवी होसमनी यांनी आयईईईद्वारे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. संदीप कुडाळ यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा सारांश सांगितला आणि सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी प्रतिनिधींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.