महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी कागदपत्रांसाठी आंदोलन करत असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या एका स्वयंघोषित कन्नड नेत्याने महाराष्ट्रातील कन्नडिगांना उठवून कन्नडमध्ये कागदपत्रे मागावीत, यासाठी फूस लावण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कन्नडमध्ये कागदपत्रे देत नाही तर कर्नाटकाने मराठी लोकांना मराठीतून कागदपत्रे का द्यावीत, असे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होत आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 50 टक्क्याहून अधिक कन्नड भाषिक रहातात त्यामुळे तिथल्या कन्नड भाषिकांना सरकारी परिपत्रक कन्नडमध्ये मिळावीत अशी मागणी बेळगावातील कन्नड संघटनांचे नेते अशोक चंदरगी यांनी ई-मेल द्वारे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे .या त्यांच्या मागणीला सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्त्युत्तर दिले असून त्यांची मागणी संबंधित संबंधित खात्याकडे पाठवण्यात आली आहे असे त्यामध्ये म्हटले आहे.
जत तालुक्यातील बागलगावचे रहिवासी मल्लेशप्पा तेली यांनी चेन्नई मधील भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त शिवकुमार यांना पत्र लिहून सांगली जिल्ह्यात जत तालुक्यामध्ये कन्नड भाषिकांना कन्नड भाषेत परिपत्रके मिळावीत अशी मागणी केली होती त्यावर शिवकुमार यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी तसे पत्र लिहिलं होता त्यावर अद्याप काहीही कारवाई झाली नसल्याचे अशोक चंदरगी यांनी प्रेस रिलीज मध्ये म्हटलंय.
अक्कलकोट आणि जत मधल्या कन्नड भाषिकाना महाराष्ट्र सरकार कन्नड परिपत्रक देत नसेल तर बेळगावतल्या मराठी भाषिकांना का मराठीत परिपत्रक द्यावीत असा प्रश्न अशोक चंदरगी यांनी विचारला आहे.
बेळगावात मराठी कागदपत्रे देण्यात येवू नये, यासाठी महाराष्ट्रातील कन्नड लोकांची ढाल करून लोकांची आणि प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चंदरगी यांनी केला आहे असे बोलले जात आहे.