कोरोनाचे संकट आता टाळत आहे,यामुळे दररोज कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेस मध्ये घट होत आहे. मात्र गुरुवार दि. 21 रोजी जुलै महिन्यातील सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह केसेसची संख्या दिसून आली असून बेळगाव जिल्ह्यातील 37 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे बेळगाव सरकारी जिल्हा रुग्णालयाने ने जाहीर केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील जुलै महिन्यातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद 21 रोजी झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून सर्व वातावरण सुरळीत असल्याचे दिसून येत आहे दररोज जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे
मात्र गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात ही संख्या जुलै महिन्यातील सर्वाधिक असून सतीश 37 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे.
निहाय जिल्ह्यातील तालुका निहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता सर्वाधिक रुग्णसंख्या रामदुर्ग जिल्ह्यात असून 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
तर बेळगाव तालुक्यात एकूण 7 जणांना कोरोना झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय अथनी 1,बैलहोगल 5,चिकोडी 1 गोकाक 2, खानापूर 4 सौंदती 6 असे एकूण 37 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.