Monday, January 13, 2025

/

सायबर पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांची बदली

 belgaum

सी एन अर्थात बेळगावचे सायबर, आर्थिक गुन्हेगारी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांच्यासह राज्यातील 92 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बजावले आहेत.

बी आर गडेकर यांची बदली बेळगाव येथील हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे तर सी एन सायबर पोलिसांचे नूतन निरीक्षक म्हणून गुप्तचर माहिती खात्याचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षापासून बी आर गड्डेकर हे सी ई एन पोलीस स्थानकाचे निरीक्षक म्हणून काम करत होते या काळात त्यांनी या पोलिस स्थानकाच्या माध्यमातून अनेक आर्थिक गुन्हेगारी उजेडात आणली होती.Gaddekar

या शिवाय सायबर फसवणुकीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या अनेकांचे पैसे परत मिळवून दिले होते. अनेक अंमली पदार्थांच्या विक्रीची प्रकरणे उजेडात आणली होती.त्यांची बदली बेळगावतल्याच हेस्कॉम(Hescom) जागृत दलाच्या पोलीस निरीक्षक पदी झाली आहे.

सी ई एन सायबर पोलीस स्थानक हे बेळगाव मधील महत्वपूर्ण पोलीस स्थानकाचे अनेक गुन्हे फसवणूक सायबर क्राईम रोखण्यासाठी या पोलीस स्थानकावर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती असणे गरजेचे असते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.