सुळगाव हिंडलगा येथील रुचिका अमोल पाटील हिने सीबीएससी केव्हीचे आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून तिने एसएसएलसीच्या सीबीएससी परीक्षेत 99.40 टक्के गुण संपादन करून शाळेसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रुचिका पाटील हिने राज्यामध्ये देखील अव्वल स्थान पटकावले आहे. रुचिका ही बेळगावातील केंद्रीय विद्यालय क्र. 2 ची विद्यार्थिनी असून तिने इंग्रजी, विज्ञान, समाज विज्ञान व संस्कृत अशा तब्बल चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत.
रुचिकाचे वडील अमोल पाटील हे सेनादलात सेवा बजावत असून आपणही आपल्या वडिलांप्रमाणे देश सेवा करणार असल्याचे रुचिकाने सांगितले. तिला आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे. उपरोक्त यशाबद्दल तिचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होते.
दरम्यान, केंद्रीय विद्यालय क्र. 2 या शाळेचा यंदाचा एसएसएलसीचा सीबीएससी निकाल 100 टक्के लागला आहे. सदर शाळेतील रुचिका पाटील वगळता चिन्मई सिद्धापूर (98.90 टक्के),
सानिका पाटील (98.60), सचिन बी. (98.40), रिद्धी रेडकर (98.20), गौरी नाईक (98.00), आदित्य नाटेकर (96.80), राम थापा (96.60), निखिल तलवार (96.40) आणि अमिता पाटील (96.20 टक्के) हे विद्यार्थी विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले आहेत.