भरधाव कार आणि मोटरसायकल यांच्यात घडलेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बेळगाव जिल्ह्यातील जालीकोप्प (ता. बैलहोंगल) गावानजीक घडली.
अपघातात ठार झालेल्यांची नावे संदीप मल्लुर (वय 11) आणि शिवप्पा मल्लुर (वय 46) अशी असून ते बैलहोंगल तालुक्यातील चिप्पटगुंडी गावचे रहिवासी होते.
अपघातामध्ये मोटरसायकलस्वार वीरन्ना चिन्नबसप्पा बगनाळ (वय 32) हा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कार बैलहोंगलहून धारवाडच्या दिशेने जात होती. त्यावेळी बेळवडीकडून बैलहोंगलकडे येणाऱ्या मोटरसायकल स्वाराशी कारची धडक झाली.
सदर अपघातात संदीप हा मुलगा जागीच ठार झाला, तर शिवप्पा याचा उपचारासाठी हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. बैलहोंगल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.