गेल्या दोन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला रुग्णांचे नातलग आणि नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना काल सोमवारी रात्री बेळगाव बीम्स हॉस्पिटलमध्ये घडली.
बेळगाव बीम्स हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसापासून चोरीचे प्रकार घडत होते. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे पैसे आणि मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मारुती मंगसुळी नामक चोरट्याला काल रात्री रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी आरोपी मारुती मंगसुळी याच्याकडून बीम्स हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.