Friday, May 3, 2024

/

दुचाकीची डिवाईडरला धडक युवक ठार

 belgaum

दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना बी एस येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे.

सुदर्शन विजय पाटील वय 22 रा.महावीरनगर हलगा बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात घडला होता.

रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन हा मंगळवारी सायंकाळी बी एस येडीयुरप्पा मार्गावरून आपल्या दुचाकीसह हलग्या कडून जुने बेळगावच्या दिशेने येत होता पावसात प्रिया बार जवळ असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गाडीसह डिवाईडरला जोराची धडक दिली.Sudarshan patil

 belgaum

या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दक्षिण बेळगाव रहदारी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.

ऐन पावसात दुचाकी किंवा कोणतेही वाहन असो सावकाशपणे काळजीपूर्वक चालवणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.