रविवारी माध्यमांनी गोकाक फॉल्स परिसरात पोलीस बंदोबस्त वाढिण्याबाबत आवाज उठवला होता.धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावर बंदी आणावी तसेच,पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी लक्ष द्यावे असे नमूद करण्यात आले होते. याची दखल घेत नूतन जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी गोकाक धबधब्याला भेट दिली आहे.
धबधबा परिसराला भेट देऊन प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्याबरोबरच कायमस्वरूपी याठिकाणी पोलिस बंदोबस्त राहील असे नमूद केले आहे.
प्रशासन नियंत्रण हवेच असे केले नमूद
सध्या पावसाळा सुरु झाल्याने महाराष्ट्रातील सीमेवर असलेल्या धबधबे आणि पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षा पर्टनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओढा धबधब्यांकडे ओढू लागला आहे . मात्र या पर्यटन स्थळांवर शिस्तीचा अभाव दिसत आहे.फॉल्स परिसरामध्ये डेंजरस सेल्फींची संख्या पाहता आगामी दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊ शकतात यावर प्रशासनाने नियंत्रण आणण्याचे मागणी करण्यात येत असल्याचे बेळगाव Live ने नमूद केले होते.
पोलिस प्रमुखांची भेट
पर्यटनाचा विकास होण्यासाठी शिस्त गरचेची आहे.या मुळे गोकाक बाबत विचार वाहवा तसेच नूतन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. याची दखल घेऊन पोलीस प्रमुखांनी धोकादायक सेल्फीला ब्रेक देण्याबरोबरच हुल्लड बाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.
शिवाय कायमस्वरूपी या ठिकाणी पोलीसाची निवड करून अशा प्रकारावर आळा घालण्यात येणार आहे.प्रसारमाध्यमांनी उठवलेल्या प्रश्नावर तात्काळ पोलीस प्रमुखांनी दखल घेत अचूक भूमिका घेतल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे