बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यामध्ये सरासरी 1237 मि. मी. पाऊस पडतो. मात्र यंदा या महिन्यात 1057.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे थोडक्यात संपूर्ण जिल्ह्यात यंदा वजा 14.53 टक्के कमी पाऊस पडला आहे.
बेळगाव सर्किट हाऊस येथील पर्जन्यमापन केंद्रात सर्वसामान्यपणे जून महिन्यामध्ये सरासरी 240.0 मि. मी. पावसाची नोंद होते, मात्र यंदा या ठिकाणी फक्त 97.8 मि. मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
सर्वसामान्यपणे जून महिन्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या बेळगाव व खानापूर वगळता जिल्ह्यातील बैलहोंगल, चिक्कोडी, गोकाक, कित्तूर, निपाणी, रायबाग व रामदुर्ग या ठिकाणी यंदा जूनमध्ये जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी जून महिन्यात पडणारा सरासरी पाऊस आणि यंदा पडलेला पाऊस अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.
अथणी 78.0 -33 मि. मी., बैलहोंगल 89.0 -111 मि. मी., बेळगाव आयबी 240.0 -97.8 मि. मी., चिकोडी 86.0 111.2 मि. मी., गोकाक 69.0 -94.6 मि. मी., हुक्केरी 102.0 -52.4 मि. मी., कागवाड (शेडबाळ) 102.5 23.4 मि. मी., खानापूर 376.0 -128.8 मि. मी.,
कित्तूर 21.2 -136.2 मि. मी., मुडलगी 53.2 -52.2 मि. मी., निपाणी 79.1 -104.4 मि. मी., रायबाग 72.2 -106.5 मि. मी., रामदुर्ग 68.0 -120.7 मि. मी., सौंदत्ती 87.0 -81.4 मिलिमीटर. या सर्व पर्जन्यमापन केंद्रातील पावसाची नोंद लक्षात घेता यंदा जून महिन्यात जिल्ह्यात वजा 14.53 टक्के कमी पाऊस पडला आहे.