Friday, December 27, 2024

/

ऍक्शन मोडमध्ये बेळगाव जिल्हा पोलीस

 belgaum

बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदी संजीव पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे बेळगाव पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत.

Belgaum police जिल्ह्यात घडलेल्या अनेक चोरीच्या प्रकरणांना गती देत अनेक चोरट्याने गजाआड करण्यात आले असून चोरी गेलेला मुद्देमाला सह दुचाकी वाहन जप्त केली आहेत यासह अनेक खून प्रकरणांचा तपास देखील वेगाने चालू केलेला आहे.

बेळगाव जिल्ह्यात जितक्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येते तएवढी अवैध वाळू उपसा कुठेच केली जात नाही, खानापूरहून गोव्याला मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून बेकायदेशीर रित्या गोव्याला पाठवली जाते यावर ब्रेक घालण्यासाठी बेळगाव पोलीस पुढे सरसावले आहेत त्यांनी कारवाईला प्रारंभ केला आहे.रविवारी खानापूर पोलिसांनी बेकादेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एक टिप्पर वाळू देखील जपलेली आहे.

सदर टिप्पर देसूर मार्गे बेकायदेशीरित्या वाळू घेऊन गोव्याकडे जात असता खानापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याशिवाय बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वर यमकनमर्डी पोलिसात देखील एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अरळीकट्टी गावाहून पाछापूर गावाकडे जाणारी एक वाळू ट्रक देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

रविवारी निपाणी ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी वाहन चोरट्याना गजाआड केले आहे आणि वाहन जप्त केली आहेत. चोरी झालेली 41 वाहन केवळ 72 तासात पकडून चार चोरट्याना देखील अटक केली आहे.

निपाणी संकेश्वर अंकली गोकाक, सदलगा कागवाड खडकलाट आणि यमकनमर्डी ठिकाणाहून चोरी झालेल्या या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत यासाठी निपाणी पोलिसांचा प्रतिसाद देखील जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी केले आहे. एकूणच बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदी संजीव पाटील यांनी पदभार सांभाळल्यानंतर अनेक प्रकरणांचा तपासाला वेग आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.