मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 15 वर्षीय
बालकाचा मृत्यू झाला होता. खानापूर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत व्याप्ती मध्ये येणाऱ्या चुंचवाड गावच्या अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी असे या घटनेत हा बालक मृत्युमुखी पडला होता गुरुवारी रात्री ही घटना घडली होती.
या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली केवळ घोषणा करून गप्प न बसता तात्काळ घटना घडलेल्या काही तासांतच आरटीजीएस च्या माध्यमातून सदर रक्कम संबंधित नातेवाईकांच्या खात्यावर जमा केली आहे . घटनेमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेची चुणूक दिसून आली.
चिंचनूर सदर बालक राहत असलेल्या घराच्या बाजूला गोठा आहे. गुरुवारी रात्री गोठ्यामधील जनावरांना चारा घालायला गेला असता अचानक भिंत अनंताच्या अंगावर कोसळली या घटनेत तो गाडला गेला आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला.घटना समजतात नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, या घटनेची नोंद नंदगड पोलिस स्थानकात झाली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बालकाच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार पाच लाखाची मदतही जाहीर करण्यात आली मात्र परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता बालकाच्या वारसांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी म्हणूनच आरटीजीएस च्या माध्यमातून संबंधितांना सदर रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करत घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याची सतर्कता दाखवून दिली आहे.
केवळ घोषणा नाही तर अंमलबजावणी
वर्षीचा पावसात घराची भिंत कोसळून मयत झालेला बेळगाव जिल्ह्यातील हा पहिला बळी आहे .सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कच्ची घरे कोसळत आहेत याकरीता सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज असते.
मात्र सदर मदत हातात मिळेपर्यंत संबंधितांना अनेक वेळा व्यवस्थेच्या पायऱ्या चढाव्या लागतात मात्र या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ केवळ घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करत आर्थिक मदत संबंधित कुटुंबीयांच्या खात्यावर जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.