Sunday, December 29, 2024

/

‘बेळगाव मनपाने गटार साक्षरता अभियान राबवावं’

 belgaum

पावसाची रिपरिप सुरू होऊन केवळ दोनच दिवस उलटले आहेत मात्र बेळगाव शहरातील जुन्या पी बी रोड हंगिरकर कॉम्प्लेक्स जवळ उड्डाण पुलाच्या पायथ्याशी गटार फुटल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अनेक दुकानात शिरले होते अनरस्त्यावर आलं होतं.

स्थानिक नागरिकांनी गटार दुरुस्तीसाठी अनेकदा महा पालिका प्रशासनाकडे साकडे घातलं तरी याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे अजून मोठ्या पावसाची नक्षत्रे यायची बाकी आहेत इतक्यात ही अवस्था असेल तर पुढे काय अशी चर्चा या भागांत सुरू झाली आहे.

दुपारी कोसळलेल्या पावसाने या भागातील अनेक दुकानातून पाणी शिरले होते दुकानदारांनी कसरत करून पाणी काढले. मनपा याकडे आता तरी लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगाव शहरातल्या उंचावर असणाऱ्या उत्तर भागातले पाणी जोरदार फोर्स मुळे येत असते आणि त्यामुळेच ही गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलेले होते हीच स्मार्ट सिटी का असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.Drainage rain water

बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील गटारीची कामेमोठ्या प्रमाणात आली, पण त्या गटारांचे योग्य प्रकारे नियोजन झाले नाही.काट कोनात वळणारी गटारे एकमेकां समोर आल्याने पाण्याच्या फोर्स मुळे पाणी बाहेर टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाण्याचे प्रमाण वाढते.बेळगावचा पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येते .त्याचा विचार करून प्रत्येक ठिकाणी निचरा होणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना जागी जागी चेंबर ची संख्या वाढवली गेली पाहिजे. गटार काटकोनात न करता त्यांना एक प्रकारची गोलाई देऊन तेथे भंडारी केली पाहिजे पाण्याला फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा करून दिली पाहिजे तरच पाण्याचा दबाव एकमेकांवर न पडता पाण्याचे नियमितपणाने निचरा होईल.

त्याचबरोबर सफाई कामगाराकडून रस्त्याची सफाई करताना अनेक वेळा कचरा न भरता तो गटारीत ढकलतात त्याचबरोबर नागरिकही प्लास्टिक बाटल्या लाकडे अशा प्रकारच्या वस्तू गटारीत टाकतात त्यामुळे गटारांचं चोकअप होऊन पाण्याचा फुगवटा वाढतो अन मग रस्त्यावर पाणी येते, या सर्व पातळ्यावर महानगरपालिका प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे.

या बाबतीत नागरिकांचे समुपदेशनही करणे गरजेचे आहे त्याचबरोबर जनतेने आळस न करता कचरा हा कचरागाडीतच टाकण्याची सक्ती केली पाहिजे अशा प्रकारे ‘गटार नियोजन’ नावाचं किंवा ‘गटार साक्षरता नावाचा एक अभियान’ घेणें गरजेच आहे तरच स्मार्ट बेळगाव होईल अन्यथा ये रे माझ्या मागल्याचं होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.