देशातील आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे (एआरटीआरएसी) सिमला येथे आयोजित दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात बेळगावच्या ज्युनियर लीडर्स विंगला जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ एआरटीआरएसी लेफ्टनंट कर्नल एस. एस. महाल यांच्या हस्ते ‘जीओसी-इन-सी युनिट साईटेशन’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे देशातील कॅटेगिरी ‘ए’ मधील चार आस्थापना /संलग्न युनिट्सची ‘जीओसी-इन-सी युनिट साईटेशन’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सिमला येथे आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल यांच्या हस्ते ज्युनियर लीडर विंग (जेएल विंग)
बेळगावसह ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) चेन्नई, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स (इएमई) स्कूल वडोदरा आणि 120 इंजिनियर रेजिमेंट यांना 2020-21 या प्रशिक्षण सालातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ‘जीओसी-इन-सी युनिट साईटेशन’ या
प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार प्राप्त कर्त्यांनी भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण नैतिकता आणि मानकांच्या उत्कर्षासाठी अपवादात्मक योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आहे.
सदर आस्थापने /रेजिमेंटच्या कमांडर, कमांडिंग ऑफिसर्सनी आपल्या सुभेदार मेजर्स समवेत सिमला येथील दिमाखदार सोहळ्यात आर्मी कमांडरकडून प्रतिष्ठेचा ‘जीओसी-इन-सी युनिट साईटेशन’ पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, जवान आणि निमंत्रित उपस्थित होते.