बेळगाव सह शहर परिसरातील आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरातून भजन,कीर्तन पुजेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बहुतांश सर्वच मंदिरातून विठ्ठलाची आरास करण्यात आली आहे.
बापट गल्ली कार पार्किंग विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने अभिषेक,भजन आणि महाआरती करण्यात आली.यावेळी आरतीचा मान रेणू किल्लेकर ,सुहास किल्लेकर तसेच सौ व श्री सदाशिव हिरेमठ यांना मिळाला यावेळी पोतदार वकील,गल्लीतील नागरिक,संप्रदाय मंडळाचे पदाधिकारी निकम,पोटे,पाटील,कंनबर्गी,कनबरकर , मिसाळ, गवाने,नागेश पवार तसेच बाल गोपाल, भाविक बहू संख्येने उपस्थित होते.
यावेळी गल्लीतील विद्यार्थी शैलेश महेश पावले याने 12 वी सायन्स परीक्षेत 97 टक्के विशेष गुणवत्तेत यश संपादन केले म्हणून संप्रदाय भजनी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन सन्मानित केले यावेळी उपवासाच्या प्रसादाचे वाटप उपस्थित सर्व भाविकांना करण्यात आले.
नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान विठ्ठलाची आकर्षक आरास
आषाढी एकादशी आणि रविवारच्या निमित्ताने येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान व शिव बसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात पांडुरंगाची आकर्षक आरास करण्यात आली आहे.यावेळी सकाळी मंदिरात सकाळी ज्योतिबा आणि विठ्ठलाला अभिषेक करून खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला तसेच दुपारी बारा वाजता महाआरती करून सर्वांना खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.
बालचमुत उत्साह
दरम्यान भातकांडे इंग्लिश मिडीयम स्कुल आणि केम्ब्रिज स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशी दिंडी आणि पालखी काढून लक्ष वेधुन घेतले होते.यावेळी बालचमुनी आकर्षक वेशभूषा करून पालखीत सहभागी झाले होते.एकूणच शहरात आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र दिसत होता.अनेक ठिकाणी लहान मुलं वेशभूषा करून फोटो डी पी मोबाईल वर ठेवत आहेत त्यामुळे सोशल मीडियावर ही आषाढी एकादशीची धूम आहे.