बेळगावच्या अंकित सतीश शानभाग यांनी अलीकडेच घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत अभिनंदन यश मिळविले आहे.
खानापूर रोड टिळकवाडी येथील सतीश शानभाग यांचा चिरंजीव असलेल्या अंकित याचे शालेय शिक्षण एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये झाले असून गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी पूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अंकित याने पीपल ट्री कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बीकॉम पदवी संपादन केली आहे.
गेल्या मे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याद्वारे तो इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मान्यता पात्र ठरला आहे.
आपल्या यशा संदर्भात बोलताना अंकित शानभाग याने कठीण अभ्यासक्रमांपैकी एक असलेला सीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रचंड संघर्ष बरोबरच कठीण परिश्रम घ्यावे लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी समर्पितवृत्तीने जवळपास दिवसाचे 16 तास सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागतो असे सांगून मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो याचे कारण मी संकल्पनात्मक स्पष्टतेवर लक्ष केंद्रित केले होते, असे सांगितले.
मेसर्स डी. बी. कुलकर्णी अँड कंपनीमध्ये सीए ज्योती जी. मठद आणि सीए संजय व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अंकित शानभाग याला सीए पद्मश्री पाटील, दीपक कलघटकर आणि श्रीकृष्ण आठवले यांचे समर्थन लाभले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन अंकित शानभाग याने अत्यंत अवघड चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परिक्षेत मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.