पाच वर्षाच्या कालावधीनंतर बेळगावत रेम्बो सर्कस चा तंबू घालण्यात आला आहे गोवा वेस जवळील फायर ब्रिगेड कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत तीन ऑगस्ट पासून रॅम्बो सर्कसची सुरुवात होणार आहे
पुणे मुंबई नंतर बेळगावचा गणेशोत्सव खूप मोठ्याने आणि उत्साहाने साजरा केला जातोय तर कर्नाटक राज्यात बेळगावचा गणपती उत्सव सर्वात मोठा असतो त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये मनोरंजनासाठी म्हणून सरकार हा येतच असतो बेळगाव शहरांमध्ये गोवा उत्तर कर्नाटक आजूबाजूच्या भागातील लोक गणेश दर्शनासाठी येत असतात त्यांना मनोरंजनासाठी म्हणून सर्कस आणि सिनेमा याकडे त्यांचा ओढा असतो यामुळे यावर्षी देखील गणेशोत्सवात या रेम्बो सर्कसची पर्वणीच या गणेश भक्त आणि स्थानिक लोकांना असणार आहे.
गेल्या पाच वर्षा पासून बेळगाव मध्ये गणेशोत्सवामध्ये कोणताही सर्कस आला नव्हता मात्र दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर आता सर्व व्यवहार सुरळीत झालेत यावर्षी सर्कसचा तंबू घालण्यात आला आहे.या सर्कस मध्ये जंगली प्राणी नाहीत मात्र जोकर अद्भुत सायकल चालवणे, दुचाकी चालवणे जिम्नॅस्टिक असे सर्व मनोरंजनात्मक खेळ आहेत
जुन्या सर्कसमध्ये तुमच्यासाठी काही क्लासिक्स आणि नवीन युक्त्या आहेत – ग्लोब ऑफ डेथ, फ्लाइंग ट्रॅपीझ, कंटोर्शन, जर्मन व्हील, सायकल ट्रिक्स आणि रोल्ला बोला यांसारख्या डेथ-फायंग कृतींपासून ते रोलर स्केटिंग, शिडी शिल्लक यासारख्या नवीन नवीन कृतींपर्यंत इथे आहेत याशिवाय लाडक्या विदूषकांचे मनोरंजक कृत्य देखील आठवणीतले आहे.
3 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान हा सर्कस बेळगाव मध्ये दररोज खेळ करणार असून दररोज दुपारी 1 वाजता सायंकाळी 4 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता असे तीन शो होणार आहेत.
तिकिटासाठी या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग Online Booking on bookmyshow.com इथे असणार असून 250, 300 आणि 400 असा तिकीट दर आकारण्यात आला आहे.
रॅम्बो सर्कसची स्थापना 1991 मध्ये झाली आणि ती पुण्यात आहे. जुन्या आठवणींसह नवीन अभिनय दाखवणाऱ्या शोसाठी त्यांच्या ३० सर्वोत्कृष्ट कलाकारांचा त्यात समावेश आहे. सर्कस पाहत मोठे झालेल्यांसाठी नॉस्टॅल्जियासह अनेक क्षमता असलेले उच्च प्रशिक्षित कलाकार यात आहेत.