भारतनगरात कर्जबाजारी विणकराची आत्महत्या

0
9
Shahapur police station
 belgaum

बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने कर्जबाजारी झालेल्या विणकराने जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शहरातील भारतनगर येथे आज रविवारी उघडकीस आली.

कल्लाप्पा रुद्राप्पा सोनटक्के उर्फ कुकडोळी (वय 58, रा. भारतनगर, हमाल वाडी बेळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विणकराचे नांव आहे. स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते.

त्यांनी खाजगी बँकेकडून सुमारे 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेचा तगादा आणि कर्जाची परतफेड करता येत नसल्यामुळे जीवनाला कंटाळून कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 belgaum

मयत कल्लाप्पा रुद्राप्पा सोनटक्के उर्फ कुकडोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. सदर आत्महत्येच्या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.