विधान परिषदेच्या कर्नाटक पश्चिम मतदार संघ, कर्नाटक वायव्य व शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उद्या बुधवार दि. 8 व गुरुवार दि. 9 जून रोजी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या कर्नाटक पश्चिम मतदार संघ, कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना उद्या बुधवार दि. 8 व गुरुवार दि. 9 जून रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत, त्याप्रमाणे दि. 14 जून रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 या वेळेत मतमोजणी बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा पंचायत सभागृहात हे प्रशिक्षण होणार असून मतमोजणी बाबत प्रात्यक्षिकेही सादर केले जाणार आहेत. निवडणूक सुरळीत आणि पारदर्शकपणे पूर्ण करणे हा यामागील उद्देश आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल. प्रॅक्टिकल ट्रेनिंग ज्योती कॉलेज येथे दि. 8 जून रोजी दुपारी 4:30 ते सायंकाळी 6:30 यावेळेत होणार आहे. त्याचप्रमाणे दि. 14 जून रोजी दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तरी नियोजित प्रशिक्षणाला निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमावलीचे पालन करून वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक आयुक्तांनी केले आहे.