शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून अकाउंट मध्ये पैसे घाला अशी भीती दाखवूत लाखो रुपये उकळणाऱ्या तिघा तोतया एसीबी अधिकाऱ्यांच्या टोळीला बेळगाव सायबर क्राईम पोलिसांनी जेरबंद केले आहे.
बेळगाव जिल्ह्यासह आजूबाजूच्या इतर जिल्ह्यामध्ये ‘आपण एसीबीचे अधिकारी आहोत असे भासवून पैसे वसुलणाऱ्या मुरगाप्पा निंगाप्पा पुजार वय 56 राहणार सदलगा चिकोडी, राजेश बापूसौ चौगुले बस्तवाड शिरोळ कोल्हापूर,रजनीकांत नागराज रा. मुगळी सकलेशपूर हासन या तिघांना सायबर पोलिसांनी रंगेहात पकडून कारवाई केली आहे.
पोलिसांच्या चौकशीत तिघां आरोपींनी आपण नकली अधिकारी असल्याचे भासवून आरटीओ रजिस्ट्रार महसूल आदी विभागाच्या विविध अधिकाऱ्याना फोन करत एसीबी अधिकारी असल्याचे भासवले आहे .
आमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा नाहीतर कार्यालयाची चौकशी करतो अशी धमकी दाखवून अधिकार्यांकडून लाखो रुपये ची लूट केली असल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले आहे
सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर आणि सहकाऱ्यांनी धाड टाकून या तिन्ही तोतया अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडून ही कारवाई केली आहे या प्रकरणी सी ई एन पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.