*हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, या शाळेमधूम 2000 – 01 साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना आणि स्नेहमेळावा 22 वर्षानंतर मोठ्या दिमाखदार उत्साहात संपन्न झाला.*
हिंडलगा गावातील सोमनाथ लॉन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर गुरजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे पाद्यपुजन करून सत्कार करत आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी गुरुजन सर्वश्री रवी तरळे, मालोजीराव अष्टेकर, बळवंत खन्नुकर, ए.बी. पिसाळे, शंकर जाधव, जे. व्ही. नाईक, आर. के. पाटील, एस. के. पाटील, आर. व्ही. रेगे, एल. डी. चौगुले, शिवाजीराव बांडगे, नारायण चौगुले, डी. बी. पाटील, आर.बी. गावडे तसेच श्रीमती अनगोळकर टिचर आणि टि. एन. पाटील टिचर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सर्वांनी शाळेच्या प्रार्थनेने केली. त्यानंतर दिवंगत शिक्षक कै. के.सी. पाटील सर व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय सैन्यात सेवा बजावत असणारे वर्गमित्र आणि ग्रामपंचायत सदस्या यांचा निवडून आलेल्या मित्रांचा सत्कार करण्यात आला.
शशिकांत खोरागडेच्या प्रास्ताविकानंतर प्रत्येक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ज्योती कणबर्गी यांनी बहारदार निवेदनातून सर्व शिक्षकांच्या स्मृती जागविनाऱ्या गोष्टी सांगत सोहळा रंगतदार बनविला. काही शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करून आपले अनमोल मार्गदर्शन केले.
आताचे मुख्याध्यापक रवी तरळे यांच्या अध्यक्षीय भाषनानंतर राजेंद्र चौगुले यांने आभार व्यक्त केले. याप्रसंगी दहावीचे 2001 बॅचचे माजी विद्यार्थी 22 वर्षानंतर बहुसंख्येने उपस्थित होते. गप्पा टप्पा आणि स्नेहभोजन होऊन स्नेहमेळावा खेळी मेळीत पार पडला.