म्हैसूरच्या चामुंडी मतदार संघातील बदामीच्या श्री बनशंकरी देवीच्या कृपाशीर्वादाखाली आश्रय घेणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आता बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या आश्रयाला येण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
सौंदत्ती यल्लमा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी हे आगामी निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याची बातमी असतानाच आता सिद्धरामय्या यांची नवी बातमी ऐकावयास मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे यावेळी सौंदत्ती यल्लमा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या विचारात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
त्यामुळे या मतदार संघातून काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार हैराण झाले आहेत. सौंदत्ती यल्लम्मा मतदार संघातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी विश्वास वैद्य आणि पंचनगौडा यांच्यासह चोप्रा हे लॉबी तयार करत असताना अचानक सिद्धरामय्या या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी व ग्रामीणचे आमदार यांच्याही नावाची अगोदर चर्चा सुरू होती आता या दोन नंतर सिद्धरामय्या यांच्या नावाची या मतदारसंघासाठी चर्चा सुरू झाली आहे.