शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधत शिवसंत संजय मोरे यांचे बंधू सुभेदार धनंजय मोरे यांनी राकस्कोप रोड वर आपल्या घरावर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेची प्रतिष्ठापना केली आहे.
बेळगावात ताशीलदार गल्ली,बसवणं कुडची आणि जुने बेळगाव नंतर राकस्कोप मध्ये घरावर ही शिव मूर्ती बसवलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे सीमावर्ती भागात प्रत्येक माणसाच्या मनात बसलेले आहेत प्रत्येक माणसाची श्रद्धा शिवाजी महाराजांवर अपार आहे हीच शिवरायांच्या वरील निष्ठा आणि श्रद्धा दाखवण्यासाठी आपल्या घरावर आपल्या घरात किंवा आपल्या खाजगी जागेत बेळगावात अनेक जणांनी आपल्या घरावर शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापना केल्या आहेत.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करायची आणि शिवाजी महाराजांची पूजन करायचे त्यांच्या विचारांचे मनन चिंतन करायचं शिवाजी महाराज आपल्या घरात असावेत शिवाजी महाराजांचा घरात वावर असावा अशा पद्धतीची एक अपार भावना सीमावर्ती भागातल्या लोकांच्या निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीच्या प्रतिमांचे प्रतिष्ठापना अनेक ठिकाणी होत चालली आहे.
बेळगाव जवळील राकसकोप सारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा आपल्या घरावर प्रतिष्ठापना झालेले हा विषय परिसरात चर्चा झालेली आहे अनेक जणांच्या मनात अशा प्रकारची भावना दाटून येते.
शिवसंत संजय मोरे हे नेहमी शिवकार्य करतच असतात आपल्या बंधूंच्या घरावर शिव मूर्ती बसवून आपण आपल्या घरातही शिवकार्य केल्याचे दाखवून दिले आहे. राकस्कोप येथील सुभेदार धनंजय रामु मोरे यांचे दोन्ही चिरंजीव संतोष मोरे व श्रीधर मोरे भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहे आहेत.