विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष नेताजी कटांबळे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपसचिव शंकर चिट्टी यांनी प्रास्ताविक केले.
पंडित नेहरू महाविद्यालयाच्या प्राचार्या ममता पवार यांनी महाविद्यालयाच्या विकासाबद्दल माहिती दिली, तर संस्थेचे सचिव प्रकाश नंदिळळी यांनी अहवाल सादर केला.
सभेच्या विषयानुसार पुढील पाच वर्षांसाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सदस्य व विक्रीकर विभागाचे निवृत्त अधिकारी सुभाष नाईक यांनी कामकाज पाहिले. यावेळी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. या कार्यकारी मंडळात अध्यक्षपदी शारदा चीमडे, उपाध्यक्षपदी नेताजी कटांबळे, सचिव प्रकाश नंदिळळी, उपसचिव शंकर चिट्टी, तसेच संचालक पदी निंगोजी पार्लेकर, परशराम गोरल, विमल मुचंडी, अन्नपूर्णा वांगेकर, मंगल नंदिळळी, एस वि साखळकर, गजानन घुग्रेटकर, वाय एन कुकडोळकर, अनंत देसाई, बी बी शिंदे, विमाल कंग्राळकर यांची निवड करण्यात आली आहे. सभेचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी यांनी केले, तर परशुराम गोरल यांनी आभार मानले.