Thursday, June 20, 2024

/

एसडीपीआय’ची डीसी कार्यालयासमोर निदर्शने

 belgaum

भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी आणि देश सांभाळता येत नसेल तर केंद्रातील भाजप सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करत एसडीपीआय संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले.

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या निषेधार्थ शहरातील एसडीपीआय संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. नुपुर शर्मा आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर एसडीपीआय संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदनाद्वारे भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. त्याचप्रमाणे देश सांभाळता येत नसेल तर केंद्रातील भाजप सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.Sdpi

 belgaum

नुपुर शर्मा सारख्या मूर्ख व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक कारवाई केली जावी. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देश-विदेशातील समस्त मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. शेअर मार्केट कोसळत आहे.

मुस्लिम राष्ट्रांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. तेंव्हा भारतीय जनता पक्षाला जर देश सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. नुपुर शर्मा सारख्या लोकांमुळे देशाचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे, असे एसडीपीआयच्या एका पदाधिकाऱ्याने निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.