शासकीय मदत पोचायच्या अगोदर छत कोसळलेल्या आजीला सकल मराठा समाजाने आधार दिला आहे.गुरुवारी बेळगावमध्ये झालेल्या पावसात बसवाण गल्ली, शहापूर येथील शालन भरमा धामणेकर यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले होते.
या आजीबाईंचे वय ८० इतके असून घरावरील छत कोसळून झालेल्या घटनेत दैव बलवत्तर म्हणून त्या सुखरूप बचावल्या होत्या. बेळगाव live ने देखील हे वृत्त प्रसारित केलं होतं .
याची दखल घेत यानंतर सकल मराठा समाजातर्फे या आजीबाईंची आज भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना आर्थिक मदत म्हणून रोख १०००० रुपये देण्यात आले आहेत.
१ जून रोजी रमाकांत कोंडुसकर यांनी हिंडलगा येथील हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती दर्शविल्यानंतर सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मराठा आणि मराठीसाठी सातत्याने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या वेळ अडचणीच्या वेळी धावून जाणारे रमाकांत कोंडुसकर आजदेखील मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्या उपस्थितीमुळे मराठा समाजाला, मराठी माणसाला आणि पर्यायाने सीमालढ्यासाठी एक खंबीर नेतृत्व मिळत असल्याची चर्चा बेळगावमध्ये सुरु आहे.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, हभप शंकर बाबली महाराज सकल मराठा समाजाचे महादेव पाटील, सागर पाटील, विशाल पाटील,
उदय पाटील, विराज मुरकुंबी, अरुण बिर्जे, विक्रांत कंग्राळकर, सचिन निर्मलकर, पवन मैगोटी, राजू बैलूर, आणि सकल मराठा समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.