विधान परिषद निवडणुकीत वायव्य कर्नाटक शिक्षक मतदार संघात भाजपच्या अरुण शहापूर यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांनी विजय मिळवला आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजपचे अधिकृत उमेदवार महंतेश कवटगीमठ यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर झालेल्या या विधान परिषद निवडणूक मध्ये देखील भाजपच्याच अरुण शहापूर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
बेळगाव जिल्हा मधून झालेल्या गेल्या दोन विधान परिषद निवडणुकीत भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागण्याची सहा महिन्यातल ही दुसरी वेळ आहे. शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरुण शहापूर यांनी मतमोजणी केंद्रातच पत्रकार परिषद घेऊन पराभवाचे कारण सांगितले आहे.
वायव्य कर्नाटक विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षक मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांनी आपल्या पराभवाची कारण मिमांसा करताना पैशाच्या वाटपामुळे राजकीय षडयंत्रातून आपला पराभव झाल्याचे म्हंटले आहे
पैशाचा वाटप होत असतानाही माझ्या बाजूने मतदान केलेल्या सर्व शिक्षकांचे मी आभारी आहे, असेही अरुण शहापूर म्हणाले. झालेल्या पराभवाचा मी नैतिकतेने स्वीकार केलेला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्री यांनी सर्वांनी प्रामाणिकपणे माझ्यासाठी कार्य केले आहे. पराभवाच्या बाबतीत मी कुणालाही दोष देणार नाही, असेही ते म्हणाले.
पैसे वाटपाबाबत आपण तक्रार करून न्यायालयात दाद मागणार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना आता मतमोजणीसह निवडणूक संपली आहे. त्यामुळे सध्या तरी मी कांही करणार नाही, नंतर पुढे बघू कसे उत्तर शहापूर यांनी दिले. निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी मला मतदान करणाऱ्या शिक्षकांच्या भल्यासाठी मी यापुढेही नेहमी भांडत राहणार आहे. वायव्य कर्नाटक शिक्षक मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप आमदार, खासदार मंत्र्यांची संख्या भरपूर आहेत ह्या सर्वांच्या मुळेच मला इतकी मते पडू शकली असेही त्यांनी म्हटले आहे.