शिवसेना आमदार आणि अपक्षांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकाकचे आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुंबईत आपले राजकीय गुरु देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्रातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर तेथील महा विकास आघाडीचे सरकार दोलायमान झाले आहे. या दरम्यान गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.
मुंबईतील वास्तव्यादरम्यान काल सायंकाळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. सीमाभागातील शिवसेना, काँग्रेस आमदारांशी रमेश जारकीहोळी यांचे चांगले संबंध आहेत.
यापूर्वी कर्नाटकात ऑपरेशन कमळ राबविण्यासाठी फडणवीस यांनी जारकीहोळी यांना मदत केली होती. तेंव्हापासून रमेश जारकीहोळी हे फडणवीस यांच्या कायम संपर्कात असतात.