टिळकवाडी येथील कर्नाटक लाॅ सोसायटीच्या केएलएस गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले असून महाविद्यालयाचा निकाल 88 टक्के लागला आहे.
गोगटे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील 58 विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि विज्ञान शाखेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढील प्रमाणे आहेत.
वाणिज्य :1) श्रीधर कामत 585 गुण (97.5 टक्के), 2) गौरदेव यम्मी 584 गुण (97.33 टक्के), 3) निधी नवनी 583 गुण (97.17 टक्के). विज्ञान : 1) ऋषिकेश हिरेमठ 592 गुण (88.66 टक्के), 2) अनिशा देशमुख 591 गुण (98.5 टक्के), 3) अवधूत नाडगौडा 588 गुण (98 टक्के).
या गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींसह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केएलएस संस्थेचे चेअरमन पी. एस. सावकार, सेक्रेटरी विवेक कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी, गोगटे पी.यू. कॉलेज गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन व्ही. एम. देशपांडे आणि प्राचार्य डॉ. श्रीमती ए. एस. केरूर यांच्यासह कॉलेजचा प्राध्यापक आणि कर्मचारीवर्गाने अभिनंदन केले आहे.