राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या(सेकंड ईयर पीयूसी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये यंदा बेंगलोरसह बेळ्ळारी आणि मंगळूर येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी नोंदविली आहे.
राज्यातील पदवीपूर्व शिक्षण खात्याने यंदाच्या पदवीपूर्व तृतीय वर्षाच्या परीक्षेतील कला शाखेमधील 10 टॉपर्सची त्याचप्रमाणे वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अनुक्रमे 10 व 13 टॉपर्सची यादी जाहीर केली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमधील पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
कला शाखा : 1) श्वेता भीमाशंकर भैरेगौडा (जि. बेळ्ळारी), 2) सहाना निंगाप्पा मडिवाळ (जि. बेळ्ळारी) 3) सानिका रविशंकर (जि. धारवाड), 4) निंगान्ना सिद्धांना असगर (जि. कलबुर्गी), 5) शिवराज (जि. गदग). वाणिज्य शाखा : 1) नीलू ब्रिंदप्रताप सिंग (बंगळूर),
2) आकाश दास (बंगळूर), 3) नेहा बी. आर. (चिक्कबेळ्ळापूर), 4) मानव विनय केजरीवाल (बंगळूर), 5) हितेश एस. (बंगळूर). विज्ञान शाखा : 1) सिमरन शेषा राव (बंगळूर), 2) इल्हाम साहेब (बंगळूर), 3) साई चिराग बी. (बंगळूर), 4) श्रीकृष्ण पेजथया पी. एस. (उडपी), 5)भाव्या नायक (उडपी).