देशभरात मुस्लिम जिहादी हिंदूंवर करत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तीव्र आंदोलन छेडून धरणे सत्याग्रह आणि निदर्शने करण्यात आली. त्याप्रमाणे राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. देशभरात मुस्लीम जिहादींकडून हिंदूंवर हिंसाचार केला जात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर देशातील 100 हून अधिक ठिकाणी इस्लामिक जिहादी मुसलमानांनी हल्ला करून दगडफेक केली आहे. त्यानंतर कांही ठिकाणी श्री हनुमान जयंती शोभायात्रावर दगडफेक झाली.
या प्रकारामुळे हिंदू समाज स्वतःच्या देशात आपल्या आराध्य दैवतांची मिरवणूक काढू शकेनासा झाला आहे. त्याच प्रमाणे काही दिवसांपासून मुस्लिम धर्माचा अवमान होत असल्याचे कारण पुढे करून देशांमध्ये सातत्याने अशांतता निर्माण करण्याचे कृत्य केले जात आहे. कायदा हातात घेऊन वारंवार हिंदू समाजावर हल्ला करणे, दगडफेक करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, आगी लावणे आदी समाजविघातक प्रकार केले जात आहेत. आमचे सहकारी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या विधानानंतर शुक्रवारचा नमाज उरकताच मशिदी मधून हल्ले करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने, वाहने जाळण्यात आली. याखेरीज सरकारी मालमत्ता आणि मंदिरांचे हे नुकसान करण्यात आले. पोलिसांवर देखील हल्ले झाले. अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या.
याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या मशिदेमधून हल्ले झाले. त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई केली जावी. मुल्ला मौलवींच्या जिहादी भाषणांवर तात्काळ बंदी घातली जावी. मुस्लिम समाजाला भडकवणाऱ्या मुल्ला, मौलवी व नेतेमंडळींवर रासुका अंतर्गत कठोर क्रम घेतले जावेत. ज्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत त्यांना सुरक्षा पुरवली जावी. ज्या मशिदी व मदरसामधून दंगल करणारा जमाव बाहेर आला त्यांची एनआयए तपासणी केली जावी. देशात जिहादी कट्टरवाद पसरवणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि पब्लिक जमात या सारख्या कट्टरपंथीय संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घातली जावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहेत.
आपल्या या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आज गुरुवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विहिंप सहकोषाध्यक्ष कृष्णा भट्ट यांनी प्रसारमाध्यमांना आंदोलनाची पार्श्वभूमी आणि आपल्या मागण्यांची माहिती दिली. देशात हिंदूंवर हिंसाचार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या षडयंत्रामागे जे कोण मुल्ला, मौलवी अथवा राजकीय नेते असतील त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली गेली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे बजरंग दलाच्या वतीने सांगितले आहे.