विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघामध्ये काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी आणि भाजपचे अरुण शहापूर यांच्यात कांटे की टक्कर सुरू असून आज दुपारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर हुक्केरी 1692 मतांनी आघाडीवर होते.
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी शहरातील ज्योती महाविद्यालय येथील मतमोजणी केंद्रात सुरू आहे. वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणुक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 10 हजार मतांची मोजणी करण्यात आली. यापैकी 9355 मते वैध ठरवण्यात आली तर 645 मते नाकारण्यात आली. या मतदारसंघात भाजपचे अरुण शहापूर आणि काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी यांच्या अटीतटीची लढत सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर अरुण शहापूर यांना 3135 आणि प्रकाश हुक्केरी यांना 4827 मते मिळाली आहेत. या पद्धतीने हुक्केरी 1692 मताने आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरी अंती शिक्षक मतदार संघातील अन्य उमेदवारांपैकी चंद्रशेखर लोणी यांना 405 मते, बन्नूर एन. बी. यांना 537 आणि श्रीनिवासगौड गौडर यांना 365 मते मिळाली होती. त्याचप्रमाणे आप्पासाहेब कुरणे, चंद्रशेखर गुडसी, बसप्पा मनीगार, श्रीकांत पाटील, श्रेनिक जंगटे, व संगमेश चिकलगुंद यांना अनुक्रमे 3, 41, 28, 8, 4 व 1 अशी मते पडली होती.
दरम्यान दुसऱ्या फेरीत देखील प्रकाश हुक्केरी यांनी आघाडी घेतल्यामुळे पराभवाच्या भीतीने भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांनी मत मोजणी केंद्र सोडल आहे