Thursday, May 23, 2024

/

चक्क सुवर्णसौधसमोर वाळविल्या शेवया!

 belgaum

सध्या उन्हाचा हंगाम संपत आला आहे. पावसाळ्यासाठी आतापासून नियोजन करत वाळवणीचे पदार्थ करण्यात गृहिणींची लगबग जवळपास संपत आली आहे.

परंतु घाईगडबडीत असणाऱ्या महिला अद्यापही ढगांचे वातावरण बघून वाळवणाचे पदार्थ साठवण्याच्या घाईगडबडीत आहेत. परंतु हे वाळवणीचे पदार्थ चक्क बेळगावच्या सुवर्णसौध समोर घालण्यात आल्याने सोशल मीडियावर कुतूहल आणि उपहासात्मक टीका टिप्पण्या आज दिवसभरात चर्चेत आहेत.

बेळगावच्या सुवर्णसौध येथे रोजंदारी तत्वावर कंत्राटी पद्धतीने स्वच्छता करणाऱ्या महिलेने चक्क शेवया वळत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सहायक कार्यकारी अभियंत्यांना घडल्या प्रकाराबाबत खुलासा देण्यासंदर्भात पत्र लिहिले असल्याचेहीसमोर आले आहे.Noodals soudha

 belgaum

सुवर्णसौध इमारतीसमोर शेवया वाळत घालण्यात आल्याने आज एकाच गोंधळ मजला आणि या महिलेवर कारवाई करण्यासाठी कंत्राटदाराला नोटीस देखील बजाविण्यात आली. ही बाब अनावधानाने झाल्याचे कंत्राटदाराने सांगत संबंधित महिलेला कामावरून कमी केल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी कठोर सूचनाही कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत.

सुवर्णसौध समोर अशापद्धतीने वळवण्यात येत असलेल्या शेवयांचा फोटो आज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हा फोटो नजरेसमोर आल्यानंतर अनेकांनी डोक्याला हात मारून घेत चवीने या प्रकारची चर्चाही केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.