शिवाजी गल्ली, गौंडवाड (ता. बेळगाव) येथील युवा समाजसेवक धर्मवीर कै. सतीश राजेंद्र पाटील यांनी समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले. त्यांच्या विचारसरणीनुसार सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजसेवक धर्मवीर कै.ल सतिश पाटील सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने घेतला आहे.
गौंडवाड (ता. बेळगाव) येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील यांचे नियोजनपूर्वक कट रचून गौंडवाड देवस्थान जमीनीच्या वादात भविष्यात आपले पितळ उघडे पडू नये याकरीता त्या1मूळे विरोधी गटांने पूर्वनियोजित कटानुसार सतीश पाटील यांचा गेल्या शनिवारी रात्री 9 -9:30 च्या सुमारास श्री. भैरवनाथ देवस्थान समोरील दीपस्तंभच्या मंदिरसमोरचं धारधार शस्त्राने सपासप वार करून खून केला.
सतिश राजेंद्र पाटील यांच्यावर तत्पूर्वी पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला होता. शेवटी कारपार्किंगचे निमित्त पुढे करून भांडण घडवून आणून धारधार शस्त्राने त्यांचा खून केला गेला. समाजसेवक सतीश पाटील हे
समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतीक, आर्थिक, धार्मिक, कला क्रीडा, सहकार, कृषी, आदी सर्वच क्षेत्रात धडाडीने उल्लेखनीय कार्य करत होते. ते म्हणजे कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करत जनतेला मार्गदर्शन करणारे लढवय्ये व्यक्तीमत्व होते. बालगोपाळ, विद्यार्थी आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. व्यसनांचे दुष्परिणामांची वेळोवेळी जाणीव करून देऊन सुसंस्कारीत समाज घडविण्याचा, समाज परिवर्तन घडवून आणण्याचा सतीश पाटील प्रयत्न करीत होते.
कै. सतिश पाटील यांच्या विचारसरणीनुसार सामाजिक बांधिलकी जपून नव्या पिढीने समाजसेवेचे व्रत हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे येऊन, चांगले विचार घेऊन कार्य करायला हवे अशी सतीश यांची इच्छा होती. आता त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊन प्रत्येकांनी दूरदृष्टी ठेवून कार्य करायला हवे. समाजाला दिशा देण्याचे कार्य युवकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे ते करण्यासाठीं समाजसेवक धर्मवीर सतीश पाटील यांच्या नांवाने संघटना काढून गोरगरिबांची सेवा करावी या उद्देशाने एकत्र येऊन कै. सतीश पाटील यांच्या मित्रपरिवाराने विचार विनियम करून ‘समाजसेवक धर्मवीर कै. सतिश पाटील सामाजिक संस्था’ स्थापण्याद्वारे समाजात संघटितरीत्या क्रांतिकारी कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजसेवक धर्मवीर कै. सतिश पाटील सामाजिक रीतसर अधिकृत नोंदणी करून स्थापना करण्याबरोबरच लवकरच ईमेल आणि संस्थेच्या नावाचे माहिती पत्रक देण्यात येणार आहे. तेंव्हा एकत्रीत कार्य करण्यासाठी सर्व मित्रपरिवाराने पुढे यावे. आपल्या भावी पिढीमध्ये चांगले संस्कार रुजवून त्यांना उत्तम ज्ञान देण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून सतीश पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कै. सतीश राजेंद्र पाटील यांच्या गौंडवाड आणि बेळगांव येथील सर्व मित्रपरिवाराने केले आहे.