छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले कलाकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगाव मधील ‘त्या’ शिवभक्त चिमुकलीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर आवर्जून शेअर केला आहे.
राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मच्छे येथील अडीच वर्षीय कु. ऋत्वी गजानन जनोजी या चिमुकलीने येळ्ळूर राजहंस गडावर जाऊन राज्याभिषेक दिन साजरा केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बेळगाव लाईव्हने तो व्हिडिओ सर्वप्रथम पोस्ट केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मच्छे बेळगांव इथल्या अडीच वर्षीय ऋत्वी गजानन जैनोजी या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय शिवराय! असे आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळगाव हे दोन विषय डाॅ. अमोल कोल्हे यांच्या जिव्हाळ्याचे आहेत.
बेळगावमध्ये कोणती घडामोड असो किंवा शिवरायांसंदर्भात कांही कार्य असो डाॅ. कोल्हे नेहमीच पुढे येत असतात. आता लहानग्या अडीच वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा बेळगाव विषयीची आपली आपुलकीची भावना त्यांनी प्रकट केली आहे.
मच्छे, बेळगाव इथल्या अडीच वर्षीय रुत्वी गजानन जैनोजी या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय!
छत्रपती शिवाजी महाराज की जय?#जय_शिवराय pic.twitter.com/GLSSUzaSCl
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 9, 2022