बसवन कुडची (ता. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या आवारात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांच्या हस्ते कार्डधारक लाभार्थींना तांदूळ वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
बसवन कुडची येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांनी घेतले श्री दुर्गा देवीचे दर्शन
बेळगाव भुईकोट किल्ला येथील श्री दुर्गादेवी मंदिराला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आज मंगळवारी सकाळी भेट देऊन देव दर्शन घेतले.
श्री दुर्गादेवी मंदिरात देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी किल्ल्यातील प्राचीन कमल बस्तीला भेट दिली. या ठिकाणी तीर्थंकरांची दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कमल बस्तीची माहिती जाणून घेतली.
यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी किल्ल्यातील विवेकानंद आश्रमाला देखील भेट देऊन आश्रमा बद्दलची माहिती तेथे चालणारे काम जाणून घेतले.
किल्ला परिसरातील केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी मान्यवर त्यांच्यासोबत उपस्थित होते.