मराठी भाषेतील सरकारी परिपत्रकांच्या मागणीसाठी येत्या 27 जून रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाबाबत मराठी युवकांनी सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त पोस्ट करू नये, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सीमालढा हा लोकशाही आणि घटनेच्या आधारावरच आधारित आहे. तेंव्हा 27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भातील जनजागृतीसाठी मराठी युवकांनी सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त पोस्ट करू नये.
सोशल मीडियावर केले जाणारे पोस्ट लोकशाहीच्या माध्यमातून घटनेला धरून असतील याची दक्षता घेत मोर्चाची जनजागृती करावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सीमाप्रश्न आणि आपल्या न्याय हक्कांसाठी सोशल मीडियावर मराठी युवकांनी सांभाळून पोस्ट करावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.