Thursday, December 19, 2024

/

यल्लमा डोंगरावरील लूट थांबवण्याची मागणी

 belgaum

सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या पुजाऱ्यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला असून त्यांच्याकडून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट केली जात आहे. तेंव्हा हा गैरप्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी करत शहरातील जय भीम ओम साई संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले.

जय भीम ओम साई संघटनेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने त्यांना योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावरील पुजाऱ्यांकडून देवी दर्शनाकरिता भक्तांकडून 100 ते 200 रुपये आकारले जात आहेत.

तसेच गाभार्‍यापर्यंत जाऊन थेट दर्शनाकरिता 500 रुपये आकारले जात आहेत. डोंगरावर शौचालय, पिण्याचे पाणी आणि राहण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात. मात्र त्याच्या तुलनेत कोणत्याही प्रकारची स्वच्छता राखली जात नाही. देवीच्या दर्शनासाठी पैसे आकारण्याबरोबरच कुंडातील पाणी आणण्याकरिता 30 रुपये आकारले जात असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

D c office
Dc office file

मोफत दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलेल्या भाविकांना डावलून पैसे घेऊन दुसऱ्या भक्तांना दर्शन दिले जात आहे. त्यामुळे रांगेत उभा राहिलेल्या भक्तांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे. पैसे घेऊन मंदिरात प्रवेश देण्याबरोबरच ओळखीच्या लोकांना पैसे न घेता दर्शनाचा लाभ मिळवून दिला जात आहे.

यल्लमा डोंगरावर येणारे भाविक हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गोरगरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे आधीच त्यांचे जीवन समस्येच्या विळख्यातून जात असते. त्यात भर म्हणून डोंगरावर प्रत्येक ठिकाणी पैसे आकारून त्यांची लूट केली जात आहे.

तरी याची गांभीर्याने दखल घेऊन देवाच्या नावाने केली जाणारी ही लूट शासनाने तात्काळ थांबवावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.